प्रतिनिधी : मुंबई.
मुंबई :अंधेरी पश्चिम विभागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते एस सेंडील कुमार यांचा वाढदिवस करोना महामारी च्या काळात मोठ्या मोठ्या जल्लोषात न करता वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
एस सेंडील कुमार यांनी वाढदिवसानिमित्त हाताच्या पोटावर जगणारे गोर गरीब जनतेला अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.सदर अन्नधान्याचे वाटप एस सेंडील कुमार व त्यांचा कार्यकर्त्यांमार्फत करण्यात आले परंतु एस सेंडील कुमार यांनी सदर अन्नधान्याचे वाटप करण्याचे छायाचित्रे प्रसारीत न करण्याचे आपल्या कार्यकर्त्याना सांगण्यात आले. आमचे प्रतिनिधी यांनी एस सेंडील कुमार यांना विनंती केल्यावर त्यांनी काही छायाचित्र देण्यास होकार दिला. आशा प्रकारे सामाजिक कार्यकरत कोणत्याही फळाची आशा न करणारे सामाजिक कार्यकर्ते एस सेंडील कुमार यांना भूमी रक्षक तर्फे त्यांच्या पुढच्या वाटचाली बद्दल व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
छायाचित्र : विलास भाकरे.