टेम्पोला दुध वाहतुकीचे लेबल लावुन गावठी दारू ची वाहतूक....
मांजरीच्या पुलावर नाकाबंदीत टेम्पो पकडला;गावठी दारूचे मोकळे ३६ व १ भरलेलं कॅन सापडले .
पुणे :प्रतिनिधी
अत्यावश्यक सेवेच्या दुध वाहतुकीचे लेबल लावून रिकाम्या ३६ व १ भरलेले कॅन ची वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक व दोघांवर रात्री उशिरापर्यंत लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मांजरी खुर्द पुलावर नाकाबंदी दरम्यान दूध वाहतूक असे लिहिलेल्या एका टेम्पोची MH 12 RN 3499 तपासणी केली असता त्यात गावठी दारूचे ३६ मोकळे व १ भरलेले कॅन आढळुन आले.पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर ,पोलीस प्रफुल सुतार,संजय वाघमारे व पोलीस मित्र अशोक आव्हाळे ,शिवाजी हजारे,कल्पेश थोरात ,समीर उंदरे,अजय भोसले,धनराज जाधव आदींनी ही कारवाही केली.