लेख: श्री.सुशील दुधाने.
भोले कि शादी मै, कश्मीर के वादि मै.
अन्नपूर्णा,नर्मदा परिक्रमा, चार धाम यात्रा, कर्दळीवन, अश्या अनेक यात्रा भाविक मंडळी वर्षभरात आपआपल्या सोयीने करीत असतात.अशीच एक अवघड व शरीराची कस पाहणारी , शारीरिक तंदुरुस्तीची तपासणी पाहणारी बाबा श्री अमरनाथ यात्रेचे आयोजन श्री. श्रीकांत देवधर व श्री यशवंत साळुंखे (सातारा)यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली.तशी ही यांची ही १६ वी अमरनाथ यात्रा, व आमची पहिलीच.अनेक वेगवेगळ्या भागातील यात्रेकरूंचा यात समावेश होता, कोणी सातारा,रहिमतपूर,वाई, बोरगाव,मुंबई,व पुणे या ठिकाणांहून सामील झाले होते.जवळपास ६१ जणांचा एक विशाल जनसमुदाय जमला. वय वर्ष २६ ते वय वर्ष ७० सर्व वयोगटातील तरुण तुर्क म्हातारे अर्क यांचा समावेश होता. दिनांक २ जुलै २०१७ ला रात्री ९.१५ वाजता मुंबई सेंट्रल येथून गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ने प्रवासास सुरुवात केली. ४ जुलै रोजी पहाटे ६ वाजता आम्ही अमृतसर येथे जवळपास १९०० किलोमीटर चा प्रवास करून पोहचलो. आम्ही सुवर्ण मंदिराच्या परिसरातील भक्तनिवास येथे मुक्काम केला व सुवर्ण मंदिर दर्शन घेऊन, जालियनवाला बाग या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली, व नंतर शेरावली गेट पासून बसने भारत-पाक सीमेवरील 'वाघा बॉर्डर' या ठिकाणी लष्कराची सूर्यास्त कवायतीला हजेरी लावली. दोन्ही देश्यांच्या सैनिकांनी आपआपली कवायत सादर केली. एकच देश प्रेम येथे ओसंडून वाहत होते, ' भारत माता कि जय' , ' जय हिंद' , ' शिवाजी महाराज कि जय' अश्या विविध नामघोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला. ५ जुलै सकाळी ६.३० वाजता अमृतसर येथून पुढील प्रवासास निघालो, गुरुदासपूर, पठाणकोट,लखन पूर येथे चेकिंग झाल्यावर पुढचा बस प्रवास चालू झाला व त्यानंतर जम्मू येथील भगवती नगर या यात्रेच्या बेस कॅम्प येथे मुक्कामाला थांबलो. व पहाटे ४ वाजता सकाळी बसने प्रवास पहलगाम च्या दिशेने सुरु झाला. ३०० किलोमीटर चा हा एकमेव डोंगरातील घाटमार्ग पार करावा लागतो. वाटेत आम्हाला बगली धरण, रामबण, बनिहाल हि गावे लागली.सुप्रसिद्ध असा २.५ किलोमीटर लांब जवाहर बोगदा, जो भारतातील सर्वात जुना व लांब असा जो १९५६ साली बांधलेला लागतो. त्यानंतर आत्ताच नव्याने झालेला ' चान नि नाचरी' हा ९ किलोमीटर लांबीचा बोगदा लागतो.हा पार केल्यावर आपण काश्मीर खोऱ्यात प्रवेश करतो, अनंतनाग येथून उजवीकडे वळून पहलगाम या लीडर नदीच्या काठावर वसलेल्या निसर्ग सुंदर गावात हॉटेल नूरमहाल येथे मुक्कामाला पोहचलो. यात्रेत चार दिवसाच्या प्रवासासाठी लागणारे साहित्य सॅकमध्ये भरून , ७ जुलै रोजी पहाटे ६ ला पहलगाम येथून सुमो गाडी ने तासाभराच्या अंतराने चंदन वाडी येथे पोहचलो. पास दाखवून चंदन वाडी गेट एंट्री मधून यात्रा vally मध्ये प्रवेश केला. प्रथमच यात्रेमधील अवघड समजला जाणारा पिस्सु टॉप ची खढी चढण पार करावी लागली.त्यानंतर मार्गात आम्हाला जोजीवल,नागा कोटी व नंतर शेषनाग अश्या विविध भागातुन मार्गक्रमण करीत जावे लागले. शेषनाग येथे जवळपास १२ किलोमीटर चे अंतर ७ तासांच्या अथक पदभ्रमण करून शेषनाग येथे मुक्कामाच्या जागी विराजमान झालो.पेटपूजा करून सर्व जण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी ८ जुलै पहाटे ६ वाजता सर्व जणांनी पदभ्रमण चालु केले. आज सर्व जणांची शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध करण्याची खरी कसोटी होती, कारण या मार्गात आम्हाला ऑक्सिजन ची कमतरता जाणवणार होती. तसेच अनेक लहान , मोठ्या चढ उताराचा भाग पार करावयाचा होता, आजची यात्रा शेषनाग येथून सुरु झाली बारबाल,महागुणास टॉप,पाबिबल,पोषपत्रि करून पंचतरणी येथे १२ किलोमीटर व ९ तासांचे पद्भ्रमण करून पोहचलो.या यात्रेतील सर्वात उंच समजला जाणारे ठिकाण महागुणास टॉप हे १४५०० फुट स.स. उंचीवर आहे. या येथे ऑक्सिजन ची कमतरता जाणवते. खूपच थकवा आणणारा असा हा भाग आम्ही सर्वांनी यशस्वी पणे पार केला. जय बाबा बर्फानी,हर हर महादेव,ओम नमः शिवाय,जय भोले अश्या विविध नामाचा जय घोष करीत आम्ही पंचतरणी येथे विश्रांतीसाठी मुक्कामी पोहचलो. आज सर्वांची खुप दमछाक झाली असल्याने, लवकर पेटपूजा उरकून झोपी गेलो. ९ जुलै रोजी आमचे पुढील पदभ्रमण चालू झाले, ज्या दिवसाची आम्ही सर्व जण आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज उजाडला होता. दोन दिवसांच्या अथक परिश्रमाने सर्वांना थकवा जरी आलेला असला , तरी त्याच उत्साहाने अंगात एक नवीन ऊर्जा संचारून व सोबतीला यशवंत साळुंखे यांच्या बासरीतून मधुर गाण्याची धून अधून मधून ऐकू येत होती , त्यामुळे आमचे पुढील अंतर भराभर पार करत आम्ही मार्गस्थ होत राहिलो. पहिलाच ३ किलोमीटर चा कस पाहणारा अवघड व नागमोडी संगम टॉप चा टप्पा पार करीत, ६ किलोमीटरचे पदभ्रमण व ३ तासांच्या अथक परिश्रमा नंतर आम्ही सकाळी ९ वाजता बाबा बर्फानी यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले.आज दर्शन घेण्याचा दुर्ध शर्करा योग होता. आज गुरुपूर्णिमा असल्यामुळे बाबा बर्फानी चा आशीर्वाद घेऊन १० वाजता परत परतीच्या प्रवासास सुरुवात केली. ६ किलोमीटर अंतर पार करून आम्ही परत पंचतरणी येथे पोहचलो.येथे पेटपूजा करून दुपारी ३ वाजता आम्ही पंचतरणी ते चंदन वाडी ३० किलोमीटर चे अंतर घोड्यावर बसून पार करण्याचा निर्णय घेतला. तसे आम्ही कसलेले ट्रेकर्स मंडळी, परंतु आमच्या ग्रूप मधील महिलांची खूपच दमछाक झाल्याने त्यांना पायी प्रवास करणे शक्य नसल्याने, व वीशेष बाब म्हणजे माझ्या बायकोचा(सीमा) हिचा हा पहिलाच मोठा ट्रेक जवळपास ३६ किलोमीटर अंतराचा , तिने कोणताही त्रास न होता लीलया पार केला. परंतु शरीलाला अधिक त्रास न देता आम्ही ८ जणांनी हा निर्णय घेतला, व आमचा प्रवास घोड्यावर बसून चालू झाला. प्रथम घोड्यावर ( लग्नाच्या वेळेस) बसण्याचा योग मला १९९३ साली आला होता.त्यानंतर आज जवळपास २३ वर्षानी पुन्हा या योग आला , परंतु या वेळेस हा योग बाबा अमरनाथ यात्रेसाठी आला.आमच्या ग्रूप मधील बऱ्याच जणांचा घोड्यावर बसून प्रवास करण्याचा हा पहिला च प्रसंग होता.त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात एक भीतीचे वातावरण चालू झाले होते ,घोडा आपणाला चंदन वाडी पर्यत व्यवस्थित घेऊन जाईल ना, ही शंका सतत येऊ लागली. सुरुवातीला खूप भीती वाटत होती , नंतर भीती हळू-हळू कमी होऊ लागली. अनेक चढ-उतार पार करीत , काही ठिकाणी जेथे घोडे जाऊ शकत न्हवते , त्या ठिकाणी घोड्यावरुन खाली उतरून पायी जावे लागत होते.काही तासानंतर आमची खरी सत्त्वपरीक्षा सुरु झाली, रात्री ८ वाजता अचानक ढग भरून आले, व काला कुट्ट अंधार झाला व अंधारातच आम्ही पिस्सु टॉप चे ३ किलोमीटर चे अवघड उताराचा भाग पार करण्याचे आव्हान आमच्या समोर उभे राहिले. तसे पाहिले तर आम्ही हे अंतर स्वतः पार करणार नव्हतो, ते तर घोड्यावर बसून च पार करणार होतो, परंतु एक बाजूला बघितले तर खोल दरी दिसत होती, हा सर्व मार्ग घोडा अंधारात च पार करत होता. परंतु मनात खूपच भीती वाटत होती जिथे आम्हाला चक्क दाट अंधार दिसत होता,बाकी काहीच दिसत न्हवते, आमची अवस्था खूपच बिकट झाली होती,मग काय आमच्या सोबत असलेल्या महिलांनी सर्व देवांचा नाम घोष सुरु केला. कोणी स्वामी समर्थ,कोणी जय भोले,साई बाबा,ओम नमःशिवाय.नाम घोष सुरू च होता , यातच भर पडली ती वरून राजाची.त्याचे आगमन झाले , मग काय म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना, अशी आमची अवस्था झाली. आधीच अंधार, त्यात पाऊस, मग काय हुडहुडी भरून आली.संपूर्ण अंग ओलेचिंब झाले.या सर्व अचानक आलेल्या नैसगिक संपती वर मात करीत आम्ही २४ किलोमीटर चे अंतर घोड्यावर बसून ८ तासात पूर्ण करून चंदन वाडी येथे रात्री ९.३० वाजता पोहचलो.सर्वाना खूपच थकवा आलेला होता.येथून पुढचा प्रवास आम्ही जीप ने पार करून पहलगाम येथील हॉटेलात मुक्कामास पोहचलो.दुसऱ्या दिवशी आम्ही पहलगाम परिसर संपूर्ण फिरलो. व रात्री परत मुक्कामा साठी हॉटेलात आलो. रात्री ९ नंतर बऱ्याच जणांना घरून फोन येऊ लागले.ताबडतोक घरी या,श्रीनगर येथे यात्रेकरूंच्या गाडीवर अतिरेक्यांनी फायरिंग केले आहे व यात ६ निष्पाप यात्रेकरू मारले गेले आहे.अश्या बातम्यांनी आम्ही सर्व जण घाबरून गेलो. खरं तर उद्या आमचा रेस्ट डे होता, परंतु पारिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेता आम्ही जम्मू ला पहाटे लवकर उठून जाण्याचा निर्णय घेतला. व निघालो वाटेत प्रचंड मिलिटरी बंदोबस्त होता, प्रत्येक पावला पावलावर जवान उभे होते , त्यांना बघून मनातील भीती दूर होत होती. सलाम त्यांच्या कार्याला,नमन भारत मातेला, नमन अश्या सैनिकांच्या मातेला , ज्यांनी या शूर सैनिकांना भारत मातेच्या रक्षणासाठी व आमच्या ही रक्षणासाठी जन्म दिला. जे स्वतःच्या परिवाराला सोडून आमची रक्षा करीत होते.आम्ही थेट जम्मू गाठले व माता वैष्णवी देवी चे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी , आम्ही अमृतसर गाठले.व तेथून मुंबई, पुणे प्रवास करून घरी सुखरूप पोहचलो. अश्या पद्धतीने आनंदी वातावरणात व थोड्या फार भीतीच्या दडपणात आम्ही १५ दिवसांची ५३०० किलोमीटर , पुणे ते पुणे यात्रा पूर्ण केली.
या संपूर्ण यात्रेत सातारा येथील रहिवाशी कदम,तसेच पुण्यातून सहभागी झालेले यात्रेकरू आप्पा जगताप, सुनील बलकवडे, शशी उत्तेकर, सुनील ताम्हाणे, पारुल मोता, सीमा दुधाणे, वंदना बलकवडे व मी सुशिल दुधाणे, यांचा विशेष सहभाग होता.