कोल्हापूर अतिरिक्त खर्चाचा भार सोसून कडगांव ते नाईकवाडी या महामार्गाचे डांबरीकरण सुरु...


प्रतिनिधि : गारगोटी । जिल्हा : कोल्हापूर। ता. भुदरगड


कोल्हापूर, ता.भुदरगड। शिवडाव सोनवडे या घाट रस्त्याला जावून मिळणाऱ्या गारगोटी नाईकवाडी या राज्य महामार्गाच्या ३५ किमी रस्त्यापैकी कडगांव ते नाईकवाडी या १५ किमी रस्त्याचा ७ मिटर ने  डांबरीकरण शुभारंभ आज करण्यात आला.या घटनेने तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे.
   कोल्हापूर गारगोटी हून सिंधुदुर्ग व गोव्याला जवळून जोडणारा, सोयीस्कर, विनाघाट रस्ता या महामार्गामूळे उदयास येत आहे. या रस्ता मार्गासाठी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने गेले २० वर्षे पराकोटीचा संघर्ष करत आणला आहे.अंतिम क्षणी काही त्रुटी दिसून आल्याने या हंगामात रखडलेल्या या घाटमार्गाचे काम पुढील हंगामात सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.या महामार्गाच्या निर्मितीमूळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.इतर घाटरस्ते सध्या धोक्याच्या पातळीवर असल्याने जीव मुठीत घेवून प्रवास करण्याची वेळ प्रवाशी जनतेवर या  निर्मितीमूळे यापूढे येणार नाही.
    कृष्णाई कंन्ट्रक्शन प्रा. लि. तर्फे संचालक शिवाजी मोहिते यांनी या कामाचा ठेका घेतला आहे. सध्या जे काम सुरु करण्यात आले आहे त्या स्तराच्या डांबरीकरणाची तरतूद अंदाजपत्रकात नसल्याचे विश्वसनीय सुत्रातून समजते.मात्र लोकांची पावसाळ्यात गैरसोय होवू नये म्हणून या कामाचा अतिरिक्त खर्चाचा भार कंपनी स्वत:वर लादून घेत आहे. डँम ची कामे पाहाणारी ही मोठी कंपनी असून अशा रस्ता स्वरुपाचे हाती घेतलेले हे पहिलेच काम या कंपनीने या रस्त्याच्या माध्यमातून घेतले आहे.रस्त्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता उलट आहे त्यापेक्षा चांगला , दर्जेदार व आदर्श महामार्ग निर्माण करण्याचा निर्धार कंपनी संचालक शिवाजीराव मोहिते यांनी केला आहे.आज शुभारंभ प्रसंगी या संचालकांनी या कामास भेट देवून समाधान व्यक्त केले. सदर माहामार्गाचे कडगांव पर्यंतचे काम या एप्रिल महिण्याच्या अखेरपर्यंत संपवणार असल्याचे सा. बा. उपविभाग गारगोटी यांचेकडून सांगण्यात आले. या कामाच्या पुर्तेतेसाठी कोल्हापूर च्या सा बा विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड,गारगोटी सा बा कडे गेले अनेक वर्षे कार्यरत राहून शिवडाव सोनवडे या घाटमार्गाच्या कागदपत्रांची धुरा वाहणारे शाखा अभियंता शिवाजीराव इंगवले यांच्याकडे या कामाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सोबत उपअभियंता डी एस  मिरजकर व त्यांचे संबंधित शाखा अभियंता शिवम कोल्हे, कंपनीचे प्रकल्प अधिकारी मोरे व त्यांचे  सारे व्यवस्थापन या साऱ्यांनी  चांगला सलोखा ठेवून वेळेत या कामाची पुर्तता करत आणली आहे.
     कोरोना प्रादुर्भावामूळे याही महामार्गाचे काम काही दिवस ठप्प होते.केलेले काम पावसाळ्यापुर्वी न केल्यास या भागातील जनतेला संपर्क व दळणवणाची मोठी कोंडी होणार होती.त्यातच बहुतांश काम हे मशिनिरीच्या साहाय्याने  असल्याचे जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.व काही अची शर्ती लादून या कामाच्या या डांबरीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आला.याबध्दल तालुक़्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, विविध क्षेत्रातील पदाधिकारी तरूण वर्गातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त केले जात आहे.
   उर्वरीत कडगांव ते गारगोटी हे १५ किमी चे काम पावसाच्या परिस्थीतीवर अवलंबून राहाणार आहे.परंतु पावसााला सुरुवात होण्यापु्र्वी जितके शक्य आहे तितके काम करण्याचा निर्धार या व्यवस्थापनेकडून व्यक्त केला जात आहे. केवळ कोरोना माहामारीमूळे लांबलेले हे रस्ता काम  येत्या सप्टेंबर नंतर लगेचच संपवणार असल्याचे सांगण्यात  आले आहे.


संपादक, साप्ताहिक टाईम्स ऑफ भुदरगड, गारगोटी.