प्रतिनिधी : मुंबई अंधेरी पश्चिम विभाग.
कोरोना वायरस पासून बचाव करण्यासाठी देशात लॉक आऊट केल्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे. अशा गोरगरीब, मजूर, गरजवंतांचे जेवणाचे हाल झाले व होत आहे अशा लोकांना उपाशीपोटी झोपू नये म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व परिवहन मंत्री, विभागप्रमुख, ऍड, डॉ. अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विधानसभा उपविभागप्रमुख व माजी नगरसेवक श्री संजय पवार यांच्या तर्फे प्रभाग क्र ६७ व ६८ मधील गरजवंतांसाठी मोफत जेवण वाटप करण्यात आले व करण्यात येत आहे.
ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांनी व ज्यांना अन्नदान करावयाचे आहे त्यांनी संपर्क करावा. ९९३०८७७१०१, ९८६९०३३१०१. असे जनतेला सुचवण्यात आले.
प्रसिद्धी : भूमिरक्षक (प्रेस)