पुनदी गावामध्ये पोलीस पाटील तर्फे अन्न धान्य वाटप....



छायाचित्रे :विशाल खोत :पुनदी गाव (सांगली कोल्हापूर)


9 एप्रिल रोजी पुनदी गावामध्ये आज  कॅनल वर सेन्टरिंग चे 14 कामगार 3 दिवस उपासमारीने खूप त्रस्त होते . या मुळे कामगारांचे जगणे कठीण झाले. त्यांच्या ठेकेदारां मुळे त्याच्या कडे जेवणाची काही पण सोय नव्हती . ही बातमी जशी पुनदी गावचे पोलीस पाटील प्रवीण सूर्यवंशी यांना कळताच त्यांनी पुनदी गावचा कॅनल म्हणजेच कामगारांचा राहत्या ठिकाणी भेट दिली व सोबत ग्रामपंचयात मधील सहकारी व सरपंच होते तरी त्यांची बाब लक्षात घेऊन त्याना अन्न धान्य वाटप करण्यात आले. यात सर्व देणगी देणारे गावकरी व ग्रामपंचयात सहकारी उपस्थित होते अशी माहिती विशाल खोत यांच्या कडून देण्यात आली.