आकुर्डेच्या मजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ......


सौजन्य : गारगोटी - (प्रतिनिधी)  जिल्हा कोल्हापूर.
        लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या आकुर्डे ता भुदरगड येथील गुलबर्गा (कर्नाटक) च्या या तीन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.शासन  किंवा कोणी दाते पुढे आल्यास या मोलमजूरी करून जगणाऱ्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळू शकतो.
    आकुर्डे ग्रामस्थांच्यातील काहींनी आजवर आपल्या परिने या कुटुंबाना चालवत आणले आहे.विशेषता या कुटुंबांच्या शेजारील राहाणाऱ्या उच्चशिक्षित प्रियांका पाटील यांनी या कुटुंबाच्या चरिर्थाकडे थोड्याफार प्रमाणात लक्ष दिले.गावातील लोकांचे या कुटुंबाकडे लक्ष वेधून घेतले.आकुर्डेच्या स्टँड परिसरात गारगोटीस जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागून या मजूरांची ही तिन कुटुंबे आहेत.तर उर्वरीत चार कुटुंबे याच तालुक्यातील कडगांव परिसरात आहेत.लॉकडाऊन वाढल्याने या लोकांसमोर आता पोटापाण्याचे गंभिर प्रश्न निर्माण झाले आहेत. पावसाळ्यातील चार महिणे वगळता इतर सर्व महिणे ही कुटुंबे आपल़्या उदरनिर्वाहासाठी शेकडो किलोमिटरचा प्रवास करून दरवर्षी भुदरगड तालुक्यात येतात.जे कष्टाचे काम असेल ते करतात आणि पाऊस सुरु होता होता आपल्या गावी निघून जातात.यावेळी अचानक केलेल्या लॉकडाऊन मध्ये ही कुटुंबे आता अडकल्याने या कुटुंबियांच्याबध्दल गंभिर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.या तीन कुटुंबात काही लहान मुलेही असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.असे अनेक मदतीचे हात पूढे आल्यास या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.*
सौजन्य :पत्रकार सुभाष माने