ग्रीन, ऑरेंज झोनमधील 29 जिल्ह्यांत उद्योग सुरू करणार;सुभाष देसाईंची माहिती


प्रतिनिधी : मुंबई.


मुंबई : ‘करोना’ला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. याचा चांगला फटका उद्योगांनादेखील बसत आहे. याच पार्श्वभूमीवर रेड झोन वगळून ग्रीन व ऑरेंज झोनमधील 29 जिल्ह्यांतील उद्योग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिली.
मुंबई-पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याची माहिती शुभाष देसाई यांनी दिली आहे.


कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कृतिदलाची आज सोमवारी मंत्रालयात त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली आहे.
तसेच देसाई म्हणाले ग्रीन व ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. ग्रीन झोनमध्ये पंधरा जिल्हे येतात. केशरी झोनमध्ये 14 जिल्हे येतात. अशा एकूण 29 जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. उर्वरित लाल पट्ट्यात 12 महानगरपालिका येतात. त्या ठिकाणी लॉकडाऊन कडकपणे राबवले जाणार आहे.


.