१०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ बनवले नाही, पण… शिवसेनेची मनसेवर टीका

वर्धापन दिनाच्या दिवशी मनसेनं शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ व्या वर्धापनाचा कार्यक्रम पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. नवी मुंबईतील विष्णूदास भावे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळामुळे ठाकरे कुटुंबातील दोन भावांमध्ये सामना बघायला मिळणार आहे. अशातच या शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेनं मनसेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्या १०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी ‘शॅडो’ की काय ते बनवले, असं म्हणत शिवसेनेने मनसेवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. ‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले, असं म्हणत शिवसेनेने मनसेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून मनसेवर टीका केली.

काय म्हटलंय अग्रलेखात?

पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं.

मुखपृष्ठ »महाराष्ट्र
१०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ बनवले नाही, पण… शिवसेनेची मनसेवर टीका
READ IN APP
वर्धापन दिनाच्या दिवशी मनसेनं शॅडो कॅबिनेटची घोषणा केली होती.
लोकसत्ता ऑनलाइन |Published on: March 11, 2020 7:21 am  
NEXT
१०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ बनवले नाही, पण… शिवसेनेची मनसेवर टीका

आणखी महत्त्वाच्या बातम्या
अरे बापरे! 'त्या' ८६ हजार लोकांमध्ये एक होता करोनाग्रस्त
महाराष्ट्रात घडलं तेच मध्य प्रदेशमध्ये होणार?; भाजपाला भीती 'अजित पवार-२'ची
आजचे राशीभविष्य, गुरुवार, १२ मार्च २०२०
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ व्या वर्धापनाचा कार्यक्रम पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. नवी मुंबईतील विष्णूदास भावे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मनसेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळामुळे ठाकरे कुटुंबातील दोन भावांमध्ये सामना बघायला मिळणार आहे. अशातच या शॅडो कॅबिनेटवरून शिवसेनेनं मनसेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्या १०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी ‘शॅडो’ की काय ते बनवले, असं म्हणत शिवसेनेने मनसेवर टीका केली आहे.

महाराष्ट्रातील किंवा देशातील सध्याच्या विरोधी पक्षाची स्थिती पाहता ‘शॅडो’ कॅबिनेटचा प्रयोग म्हणजे ‘हा खेळ सावल्यांचा’ नाट्यप्रयोग ठरू नये. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेताच नाही व राज्यात विरोधी पक्ष अद्याप बादशाही भूमिकेतून बाहेर पडायला तयार नाही. ‘शॅडो’ची घोषणा करताना त्यांच्या प्रमुख नेत्यांना छाया मंत्रिमंडळास तंबी द्यावी लागली की, ‘‘जपून करा, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका.’’ हे बरे झाले, असं म्हणत शिवसेनेने मनसेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून मनसेवर टीका केली.

काय म्हटलंय अग्रलेखात?

पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच आहे. या शॅडो मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी एखादा ‘शॅडो’ राज्यपाल नेमला असता तर योग्य ठरले असते. म्हणजे ‘खेळ सावल्यांचा’ अधिकच रंगतदार झाला असता. महाराष्ट्रात विनोद शिल्लक आहे, राजकारणात विनोदाला वावडे नाही हे पुन्हा दिसलं.

महाराष्ट्रातील घडामोडींमुळे देशातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हा एका रात्रीत विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसला. भाजप विरोधी पक्ष झाला तरी अद्याप सत्ताधारी असल्याच्या तोऱ्यात वागत आहे. हे जरा गमतीचे वाटते.

संसदीय लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षाचे स्थान हे सत्ताधाऱ्यांच्या तोडीस तोड असते, पण विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्थान आणि कार्य नेमके काय असते याबाबत आपल्याकडील राजकारण्यांचे अज्ञान आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरांवरील विरोधी पक्ष ‘फुटकळ’ प्रयोग करीत असतो. अशा प्रयोगाने विरोधकांची प्रतिष्ठा कमी होते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड अशा देशांतील संसदीय लोकशाहीत पंतप्रधानांइतकेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.

संसदीय लोकशाहीचा तो अविभाज्य भाग आहे. किंबहुना त्याचे वर्णन ‘पर्यायी पंतप्रधान’ (प्रिटेंडर टू डू प्राइम मिनिस्टर्स थ्रोन) असेच केले जाते. लोकशाही व विरोधी पक्षाच्या बाबतीत हे घडाभर तेल ओतायचे कारण असे की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर ‘नजर’ ठेवण्यासाठी एक ‘शॅडो कॅबिनेट’ एकमेव आमदार असलेल्या पक्षाने जाहीर केले आहे. हे ‘शॅडो’ मंत्रिमंडळ राज्यातील लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे काय व कसे चालले आहे यावर म्हणे लक्ष ठेवील. सरकारच्या चुकीच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यासाठी हे ‘शॅडो कॅबिनेट’ बनवले आहे असे संबंधित राजकीय पक्षातर्फे जाहीर केले आहे.

सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादे चांगले काम झाले असल्यास त्यांचे अभिनंदन करावे असेही सांगण्यात आले. मुळात अशा प्रकारचे ‘शॅडो कॅबिनेट’ कोणी तयार करावे? याबाबत काही संकेत आहेत. हा प्रयोग संसदेतील प्रमुख आणि प्रबळ विरोधी पक्षाने करायचा असतो. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे व तिथे भाजप हा एक प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्या १०५ आमदारवाल्या पक्षाने ‘शॅडो’ मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी ‘शॅडो’ की काय ते बनवले