नाशिक शहर. मोरवाडी परिसरात मोठय़ा प्रमाणात अन्न वाटपाचा कार्यक्रम संपन्न.....

 



प्रतिनिधी : अविनाश उंदरे.


छायाचित्र: चेतन कुंजीर.


 30/03/2020  


नाशिक शहर. मोरवाडी परिसरात मोठय़ा प्रमाणात अन्न वाटप करण्यात आले.. यावेळी पैलवान गणेश सोनवणे, सुनिल भोर, आबा पाटील, श्रीकांत सोनवणे, बाळु उनवणे.. 


जीवघेण्या कोरोणामुळे नाशिक बंद आहे. त्यामुळे अनेक गरिब लोकांचे एकवेळसचे जेवण करणेही मुश्कील झाले आहे. याचीच जाणीव ठेवून आज मोरवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पैलवान गणेश आप्पा सोनवणे (सरचिटणीस शिवसेना माथाडी संघटना) व सामाजिक कार्यकर्ते बाळु भाऊ उनवणे, श्रीकांत अण्णा सोनवणे (उपजिल्हाप्रमुख शिवसेना) यांनी सहकार्यांसह गरजुंना अन्नदान केले. यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनिलभाऊ भोर,  शिवसेना माथाडी कामगार संघटनेचे नाशिक जिल्हा सरचिटणीस आबासाहेब पाटील यांच्यासह सचिन भाऊ आव्हाड व  मोरवाडी परिसरातील  सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ५०० हुन अधिक लोकांनी स्नेहभोजन केले. अजून काही ठिकाणी गरजुंना अन्नदान करणार असल्याचे सांगण्यात आले.