पोलिसांना हात लावलं तर याद राखा, भूमी रक्षकची सरकारकडे कारवाईची मागणी....


प्रतिनिधी : अविनाश उंदरे.(  जिल्हा पुणे )
मुंबई भूमी रक्षक: चीन वुहान मधून आलेल्या करोना व्हायरस चे संकट पूर्ण जगभर  पसरले आहे. या व्हायरस मुळे लाखो लोकांचे प्राण गेले व जात आहे. या परिस्थितीत सर्व देशाचे सरकार जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. रहिवाशांना घराच्या बाहेर न येण्याची वारंवार विनंती करत आहे. परंतु काही भागात जनता या कडे दुर्लक्ष करतआहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस आपले घरदार आपल्या कुटुंबाला सोडून करोना व्हायरस ची पर्वा न करता डोळ्यात तेल टाकून रात्रंन दिवस पहारा देत आहेत तरीही काही ठीकाणी जनता ऐकून न ऐकल्या सारखे करत असल्याने नाईलाजाने पोलिसांना लाठी चार्ज करावा लागत आहे. आशा परिस्थिती मध्ये काही समाज कंटक पोलिसांना मारहाण व दगड फेक करून घायाळ करत आहे या संदर्भात अनेक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरी अशे प्रकार थांबले नाही तर भूमी रक्षक आशा समाज कंटका विरुध्द कडक कारवाई करण्याची मागणी सरकार कडे करणार आहे.