अन् उद्धव ठाकरेंसमोर अजित पवारांनी शिवसेना आमदाराची उडवली खिल्ली


नागपूर:अजित पवार आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जातात.ते मनातील बोलतात अस म्हटल जात.दरम्यान दिलखुलास अजित पवार यांनी काल चक्क उद्धव ठाकरे यांच्यासमोर शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना टार्गेट केले.


अजित पवार म्हणाले,”चांद्यापासून बांद्यापर्यंत काम झाले पाहिजे.आपल्याकडे म्हणतात ना चांद्यापासून बांद्यापर्यंत.आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे काम झालं पाहिजे.आज इथ माझी अर्थमंत्री(मुनगंटीवार) नाहीत.त्यांनी बरोबर चांदा काढला आणि बांदा काढला.मधल सगळ तसचं.”


पुढे ते म्हणाले,”हवं तर देवेंद्र जी आणि चंद्रकांत दादांना विचारा.चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ काम झालं असेल तर म्हणेन ते ऐकेन.”हे झाल्यावर
त्यांनी दीपक केसरकर यांना टार्गेट केले


ते म्हणाले,”एक राज्यमंत्री (दीपक केसरकर) कुठले होते चांद्याचे म्हणजे सिंधुदुर्ग चे.तर एक मंत्री कुठले होते बांद्याचे म्हणजे चंद्रपूर चे.या पठ्ठ्याने दोघांची आपली शहर निवडली.अन् दोघांचा विकास चालला आहे.मी आकडेवारी देऊ शकतो.तुमचा नाईलाज असेल मुख्यमंत्री महोदय कारण सगळ्यांना असले हौसे नवसे सांभाळावे लागतात.(केसरकर यांना उद्देशून)”


तेवढ्यात काही आमदार बोलू लागतात.मग अजित पवार म्हणतात,”केसरकर यांना हे मान्य नसले तर त्यांना कशा मार्गाने निधी द्याचा हे मी ठरवेन.काळजी करू नका.”दरम्यान अजित पवार बोलत असताना आदित्य ठाकरे हसताना दिसत होते.