मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. कारण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या दृष्टीने विचार करत आहेत. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करावा अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.