प्रतिनिधी : भूमी रक्षक
मुंबई:संघर्ष या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते पृथ्वीराज मस्के यांना माजी केंद्रिय माहिती आयुक्त शैलेंश गांधी यांच्या हस्ते नुकतेच आर टी आय ऍक्टिव्हिट फोरम द्वारें लोअर परेल येथील एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. माहिती अधिकाराच्या माध्यमातून राज्य सरकार व मुंबई महानगर पालिकेची कोट्यावधीची बचत मस्के यांनी केली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थिती होते.