“संजय राऊत एक नंबरचे फेकाडे, राज ठाकरेंनी सामनात आणले नसते तर…”; मनसेचा हल्लाबोल

“संजय राऊत हे एक नंबरचे फेकाडे आहेत,” असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. बुधवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या समर्थकांनी आपली गाडी जाळली होती असं वक्तव्य केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राऊतांवर टीका केली.