शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभे तर्फे हिंदुहृदयसम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजितभव्यदिव्य अंधेरी महोत्सव 2020 मधे आयोजित


प्रतिनिधी भूमिरक्षक:


शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभे तर्फे हिंदुहृदयसम्राट श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजितभव्यदिव्य अंधेरी महोत्सव 2020 मधे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात सर्वासाठी क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान सोहळा, भरपूर मनोरंजन आणि मुंबईत एक आगळी वेगळी बीच वॉलकथन आयोजित करण्यात आली आहे.
अंधेरी महोत्सव मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या असामान्य व्यक्तीमत्वांचे अंधेरी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी गौरवगाथा सादर करणारा गर्व महाराष्ट्राचा या सांस्कृतिक कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व शिवसेनेचे विधानसभा समन्वयक सुनील खाबिया यांच्या तर्फे करण्यात येणार आहे.